फळे

साभार....डॉ. हेमंत सहस्त्रबुद्धे
आपण उपवासाला फळे का खाल्ली जातात ते पाहू या.
उपवासाला फळे यासाठी खाल्ली जातात की फलाहारात पाणी असले तरी ते संतुलित प्रमाणात असते. फळे खाल्याने जास्त तहान लागत नाही. पाणी सुद्धा शरीराला पचवावेच लागते. इथे हे नमूद करावेसे वाटते की "गार" पाण्यापेक्षा "गरम" पाणी पचतेही लवकर आणि पचनाला मदत सुद्धा क...रते. "गरम" पाण्याने वायू सरकतात. पोट साफ रहाण्यास मदत होते. फळातले पाणी शरीराला पचवण्याचा वेगळा ताण देत नाहीत. त्यातील "Enzymes " म्हणजेच "विकर" हे पचनाला अतिशय उपयुक्त असतात. म्हणून एरवीही उपास नसताना "फळे" ही जेवणानंतर नाही तर जेवणा आधी खावीत म्हणजे त्यातील या "Enzymes " मुळे शरीरात अन्न पचवण्यास पोषक असे वातावरण तयार होऊन अन्न नित पचते. त्यातील ग्लुकोज, फ्रुक्टोज वगैरे शर्करा म्हणजेच साखर ह्या पुर्वपाचीत असतात. म्हणजेच फळ खाल्ले की अतिशय कमी श्रमात ते शरीराला फायदा करून देते. त्यातील "Minerals " म्हणजेच विविध क्षार आणि जीवनसत्वे हे अतिशय योग्य प्रमाणात आणि शरीरातील आवश्यक घटकांची पूर्ती करणारे असतात.
तसेच "प्रत्येक" ऋतू मध्ये येणारी फळे ही त्या वातावरणाला साजेशी म्हणजेच त्या ऋतूतील त्या वातावरणात शरीराला आवश्यक अशीच असतात. उदा. उन्हाळ्यात येणारा आंबा आणि त्याचे रूप कैरी...ही आवश्यक आहे उन्हाळ्यात घामाने खूप जास्त क्षार शरीराबाहेर जाऊन येणार्या थकव्यावर...कैरीतील "आम" म्हणजेच "Acid " आणि भरपूर क्षार शरीराचा थकवा पटकन घालवतात. म्हणूनच भरपूर गूळ, मीठ, वेलदोडा[ पाचक] घातलेले पन्हे उन्हातून आल्यावर घेतले की कसे गारेगार आणि समाधानी वाटते. आम्बरसाने तरुणांना आवश्यक शक्ती पटकन मिळते. हिंदू धर्मात ठायी ठायी माणसाचे शरीर, समाज, निसर्ग, खगोल, भूगोल....आणि बरेच काही याचा सतत विचार केला आहे आणि ते धर्माच्या नुसत्या गोड नाही तर पाचक गोळीतून हिंदू धर्मियांना दिले आहे.
शिवाय निसर्गोपचार शास्त्रानुसार आंबट फळे की ज्यात "Acid " असते ती दुधाबरोबर खावीत...उदा. संत्री, मोसंबी, लिंबू वगैरे...की ज्यामुळे दुध पचते. हा पण दुधात घालून त्याचे "फ्रुट सलाड" करून नाही...तर दुध घेण्याआधी किंवा दुध घेतल्या नंतर. तसेच गोड फळे ही ताका बरोबर खावीत. उदा. चिकू, केळी वगैरे...इथे आंबा हा गोड असला तरी या नियमाला अपवाद आहे. तो मात्र दुधाबरोबर खायचा असतो. दुधाबरोबर आंबा खाल्याने तो उत्तम पचतो आणि उष्ण पडत नाही. शिवाय अनेक फळे ही त्या त्या परदेशातील विशिष्ट हवामानानुसार तेथे येत असतात. निसर्गाने ही माणसाची करून ठेवलेली उत्तम सोयच आहे. उदा. नारळ, तिळ आणि राई. ही अनेक गोष्टीत वापरली जाणारी पण "तेल" बनवण्यासाठी वापरली जाणारी फळे किंवा तेलबिया पाहिल्या तर "नारळ" हे थंड आणि त्याच्या पाण्यात सगळे क्षार, जीवनसत्वे [त्यात फक्त Acid नाही म्हणून नारळ पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास त्याची परिणामकारकता वाढते. ] आणि गरात भरपूर पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने असलेले असे हे अमुल्य फळ अत्यंत उष्ण आणि दमट हवामान असलेल्या कोंकण किनारपट्टी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पंच द्रविड प्रदेशात मोठ्या प्रमाणात उगवते. आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर येथे केला जातो उष्ण आणि दमट हवेने शरीर पिचते. खंगते. येथे नारळ अतिशय उपयुक्त आहे. मध्य, पूर्व आणि उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, गुजराथ या भागात शेंगदाणा आणि तिळ ही तेलबियांची पिके होतात. यांची तेले येथल्या "समशीतोष्ण" हवेत पोषक आहेत. तर उत्तर मध्य प्रदेश पासून वरील जवळ जवळ सगळ्या थंड हवामानाच्या प्रदेशात "राई" सारखे उष्ण तेल वापरले जाते. आणि ते तेथे उत्तम उगवते देखील.
म्हणून उपवासाला ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांच्यासाठी केळी, चिकू, आंबा ही फळे उपयुक्त आहेत तर दुर्बल पचन असलेल्यांना संत्री, मोसंबी, सफरचंद, बोरे, पपई ही फळे अतिशय उपयुक्त आहेत. पपयीची फळे आणि "पाने" देखील "प्रोटीन" च्या पचनासाठी अतिशय उपयुक्त आहेत. "जांभळे" हल्ली इकडे तिकडे वाचून "मधुमेही" लोकांना उपयुक्त आहेत हे तर सगळ्यांना माहित झाले आहे. पण ती एकतर उपाशीपोटी खाऊ नये आणि जास्त प्रमाणात खाऊ नये नाहीतर ती "उपाया" पेक्षा "अपायच" जास्त करतात. असो या "फळ पुराणाचे " "फळ" सर्वाना मिळो ही प्रार्थना देवाकडे करून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सु"फळ" संप्रूण[संपूर्ण].

No comments: